नागपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या रात्री एडन ग्रीन्स रिसॉर्टवर आयोजित ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद झाला. जुनी कामठी पोलीस वाद मिटवण्यासाठी पोहोचले असता आयोजकांनी पोलिसांशी अरेरावी करत ‘मी थेट बावनकुळेंशी बोलेन’ अशी धमकी दिली, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले की, संगीत बंद करून वाद मिटवण्यात आला आणि एफआयआर नोंदवला नाही. मात्र राजकीय दबावाचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. DCP निकेतन कदम यांनी व्हिडिओची चौकशी सुरू असल्याचे सांगितले असून, लवकरच आयोजकाला चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.