फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्तीवर अचानक तीन मुलांमध्ये लुळेपणा आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. १५ दिवसांच्या उपचारानंतर तिन्ही बालकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, मुलांना पूर्णपणे आरोग्यदायी होण्यासाठी काही काळ लागेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावात आणि परिसरात सर्वेक्षण केले आणि सुदैवाने इतर कोणालाही लुळेपणा आढळला नाही.