महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र-तेलंगण दरम्यान वाहतूक होत असते. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरुर-विरूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, वर्धा-वैनगंगा नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.