नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेला कांदा याची लागवड काही ठिकाणी सुरू झाली आहे. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात शेतजमिनी व घरांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही नाशिक जिल्ह्यातील काही भागांत फक्त रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. विहिरींमध्ये अद्याप पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. RNO