आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कोर कमिटीतील आठ सदस्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलनाची परवानगी नाकारत मैदान तातडीने रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.