सातारा शहरालगतच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या युवकाला पोलिसांनी जीवदान दिलं. शांताराम पवार असं त्या तरुणाचं नाव असून, पत्नीशी झालेल्या वादामुळे तो आत्महत्या करण्यास गेला होता. पोलिसांनी तत्काळ दाखवलेली सतर्कता आणि त्याच्या समजावण्यानंतर त्याला सुरक्षितपणे कड्यापासून काढले आणि त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे एक जिव वाचला.