नांदेडमधील बारड रस्त्यावरील तौरना तांडा परिसरात गोमास घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये पोलिस कर्मचारी परमेश्वर श्रीमंगले गंभीर आणि दादाराव श्रीरामे जखमी झाले. गंभीर जखमीला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार, गोमास व दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.