सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस स्टेशन व विविध ग्रुपच्या सहकार्याने भैरवनाथ डोंगरावर आयोजित २ किमी हिल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत युवा गटात साहिल पांढरे, लहान गटात आर्य निंबाळकर तर मोठ्या गटात रोहित निंबाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना एपीआय सुशील भोसले यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.