चीनच्या Guangzhou येथील Kaiwa Technology मध्ये डॉ. झांग किफेंग यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी जगातील पहिला मानवतुल्य रोबोट सर्जरेट तयार करण्याचा दावा केला आहे, जो प्रत्यक्ष बाळाला जन्म देऊ शकतो. या प्रकल्पात कृत्रिम गर्भाशय वापरून रोबोटमध्ये गर्भधारणा अनुकरण केली जाते, आणि बाळाला नऊ महिन्यांच्या कालावधीत पोषण पुरवले जाते. प्रोटोटाइप येत्या वर्षी सादर होणार असून, किंमत सुमारे १२ लाख रुपयांहून अधिक असू शकते. हा रोबोट संपूर्ण गर्भधारणा आणि जन्म प्रक्रिया अनुभवण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे