हैदराबादमध्ये एका प्रेमविवाहाचा हृदयद्रावक अंत झाला आहे. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा पती महेंद्र रेड्डी याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करून मुसी नदीत फेकले. महेंद्रने स्वतःच एका नातेवाईकाला या गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय यातून हे क्रूर कृत्य घडल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.