पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित झाला. बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जाधव यांनी शेतकऱ्यांसमवेत पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकले आणि डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. यावेळी जाधव यांनी पीएम किसान सन्मान योजनेला शेतकऱ्यांचा सन्मान आणि मदत म्हणून ओळखले.