‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल हे उपस्थित होते. मुख्यंमत्री फडणवीसांच्या भाषणाच्या वेळी काही शिवप्रेमींनी घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्यामुळे “खालिद का शिवाजी” या चित्रपटावर बंदी घालावी अशी त्यांनी मागणी केली. यावर मुख्यमंत्री यांनी “तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे, कार्यक्रम खराब करू नका” असे बोलले. सध्या सर्वत्र या चित्रपटाबाबत शिवप्रेमी आक्रमक झाले असून सेन्सॉर बोर्डाने याला परवानगी देऊ नये अशी त्यांची मागणी आहे.