कोल्हापूरच्या नांदणी येथील सुप्रसिद्ध महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा येथे पाठवली गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. महादेवी हत्तीण परत कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी इचलकरंजी आणि सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने नांदणी ते कोल्हापूर अशी भव्य मूक पदयात्रा काढली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी ही यात्रा सुरू झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप झाला.