पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या ४४ वर्षीय नराधमाने २०१९ पासून १९ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केले. घरात कोणी नसताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले आणि त्याचा वापर करून वारंवार अत्याचार केले. या नराधमाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीला अटक केली असून POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.