पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी (सकाळी ९-११, संध्याकाळी ४-८) ट्रेन दर ६ मिनिटांनी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही फेरी दर ७ मिनिटांनी असते. या बदलामुळे ६४ अतिरिक्त फेऱ्या होऊन एकूण फेऱ्या ४९० वरून ५५४ होतील. विना गर्दीच्या वेळी मात्र ट्रेन दर १० मिनिटांनी धावेल. जुलैमध्ये दररोज १.९२ लाख प्रवासी असलेली संख्या ऑगस्टमध्ये २.१३ लाखांवर पोहोचली आहे.