वानवडीतील २०२३ च्या खून व खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात गेले दोन वर्षे फरार असलेले सिकंदर शेख, जाकीर सय्यद आणि अमिर सय्यद यांना पुणे गुन्हे शाखा युनिट ५ ने कर्नाटकातील विजापूर येथे पकडले. आरोपींनी गुन्ह्यानंतर लपून राहत फिर्यादीला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.