पुणेकरांच्या विस्तारासाठी आणि प्रवासीयांना प्रवास सोप्पं होण्यासाठी आता स्वारगेट ते कात्रज फक्त 15 मिनिटात पूर्ण होणार आहे. ते हि मेट्रो ने. या मेट्रोचा कंत्राट जारी करण्यात आला असून नोव्हेंबर महिन्यात या मार्गाचे काम करण्यासंदर्भात ऑर्डर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्वारगेट-कात्रज या मार्गाच्या भूमिगत विस्तारासाठी सेमइंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेडला कंत्राट दिले आहे. याबाबत महा मेट्रो अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून लवकरच एंगेजमेंट लेटर मिळेल. तर या मार्गाच्या कामासंबंधित वर्क ऑर्डर नोव्हेंबरमध्ये येण्याची अपेक्षा आहे, तर या कामाची सुरुवात 2025 म्हणजे या वर्षीच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पुणे मेट्रोच्या टप्पा II चा भाग असणारा आहे. सातारा रोडवरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासोबतच कात्रज आणि स्वारगेटमधील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. याबाबत ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट लेटर साइन करण्यात येणार आहे. आम्ही १० दिवसांत कंत्राट निश्चित केले असून शॉर्टलिस्ट केलेली कंपनी पुढील महिन्यात काम सुरू करेल अशी माहिती महा मेट्रोचे डायरेक्टर (वर्क्स) अतुल गाडगील यांनी दिली आहे.
स्वारगेट ते कात्रज हा भूमिगत मार्ग ५.५ किमीचा असेल. यात पद्मावती, कात्रज आणि मार्केट यार्ड तसेच बलाजी नगर आणि बिबवेवाडी स्टेशन या स्टेशन चा समावेश असेल. सध्या स्वेअरगेट ते कात्रज प्रवास करण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ लागतो. परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, कात्रज आणि स्वारगेटमधील प्रवासाचे वेळ सध्या ४० मिनिटांवरून अंदाजे १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा होईल. आणि प्रवासाचा वेळ देखील वाचेल.
मेट्रोच्या कंत्राटाबाबतची सुधारित निविदा ११ एप्रिलला जारी करण्यात आली असून या प्रकल्पासाठी सहा प्रमुख बांधकाम कंपन्यांनी बोली सादर केल्या होत्या, यामध्ये टाटा प्रोजेक्ट्स, आयटीडी सीमेंटेशन, एल अँड टी, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, अफकॉन्स-एसएएम इंडिया आणि एचसीसी-कल्पतरू जॉईंट व्हेंचर या कंपन्यांचा समावेश होता.