जनावरांची वाहतूक करत असताना हिंदुत्ववादी संघटनेकडून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली मारहाण केली जात आहे. या घटनेचा निषेध करत अशा समाजकंटकावर बंदी घालण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे, त्याचबरोबर गेल्या आठवड्यात खामगाव शहरांमध्ये गाय चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला मारण केल्याची घटना घडली होती. त्या आरोपीवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत जनावरांची खरेदी विक्री करणार असल्याचा पवित्र कृषी समाजाने घेतला आहे.