मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी जाहीर केलं की 238 नव्या एसी लोकल ट्रेनसाठी अडथळे दूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत स्वयंचलित दरवाज्यांसह दोन नॉन-एसी लोकलचे प्रोटोटाइपही तयार होणार आहेत. तसेच 12 डब्यांच्या लोकल ट्रेनचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल, दादर, वांद्रे, जोगेश्वरी व वसई स्थानकांचा विकास आणि CSMT पुनर्विकास प्रकल्पालाही गती देण्यात येणार आहे. हा सगळा बदल मुंबईच्या प्रवासाला अधिक सुरक्षित, जलद आणि गारेगार बनवणार आहे.