नागपूरहून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी जनजागरण मंडल यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “फडणवीस साहेब, तुम्ही आणि तुमच्या पक्षानेच ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं,” असा थेट आरोप करीत त्यांनी कमंडल दाखवत खुलं चॅलेंज दिलं.
यात्रा आज शेगावात पोहोचली असून, संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन ओबीसींच्या घोषणांसह जनजागृती करण्यात आली. यात्रेत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.