राज ठाकरे यांनी वाहतुकीतील वाढत्या बेशिस्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, “पूर्वी मुंबईत रात्री १२ वाजता सुद्धा दुचाकी चालक सिग्नलवर थांबायचे. पण आता दुपारी १२ वाजता सुद्धा कोणी थांबत नाही. हा कायद्याला न जुमानणारा प्रकार धोकादायक आहे. जर कायद्याचा धाकच उरला नाही तर शहर कसं उभं राहणार? अशीच बेशिस्त वाढत गेली तर पुढे यावर नियंत्रण आणणं अवघड होईल.”