राज ठाकरे यांनी राज्यातील ट्रॅफिक समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले की, “पार्किंगची समस्या दिवसेंदिवस भीषण बनत आहे. ‘नो पार्किंग’ बोर्ड कोणी वाचत नाही, पार्किंगची ठिकाणे व्यापारी आणि फेरीवाल्यांनी ताब्यात घेतली आहेत. काही ठिकाणी पार्किंग लीगल, काही ठिकाणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे.” ठाकरे यांनी पुढे स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर तुम्हाला गाडीचा भाव परवडतो, तर पार्किंगचाही भाव परवडला पाहिजे. गाडी घेतली म्हणजे ती रस्त्यावर कुठेही फेकायची परवानगी नाही. अजूनही वेळ गेली नाही, आत्ताच पावले उचलली तर प्रश्न सोडवता येईल. नाहीतर चार-पाच वर्षांनी ही समस्या हाताबाहेर जाईल.”