Abu Azmi on Vande Mataram issue : राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत संपूर्णपणे गायन करणं अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु आता या वंदे मातरम बंधनकारकी करण्याच्या निर्णयाला राजकीय वळण आल्याचे दिसून येत आहे. कारण या मुद्द्यावरून आता अबू आझमी कडाडल्याचं दिसून येत आहे.
वंदे मातरम म्हणणे बंधनकारक करणे योग्य नाही, मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष देणे गरजेचे. विनाकारण वंदे मातरम सारखे प्रश्न आणायचे, वोट साठी भाजप काहीही करू शकतं. भाजप हिंदू-मुस्लिम करत राहतो असा आरोप लगावत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम ला विरोध दर्शवला आहे. तसेच मुस्लिम समाज दुखी राहिला पाहिजे अशी भाजपाची इच्छा असते. त्यांचे सरकार आहे म्हणून त्यांच्यात अहंकार भरला असून गांधी, आंबेडकर यांना मानणाऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्यांना थांबवलं पाहिजे. असेही यावेळी ते म्हणाले.
हे हि वाचा : राज्यातील शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चं पूर्णपणे गायन अनिवार्य; 7 दिवस चालवणार विशेष मोहीम, सरकारचा निर्णय
मी कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी होणार नसून उत्तर भारतीयांना शिव्या देणाऱ्या बरोबर आम्ही नाहीत. आम्ही काँग्रेस सोबत आधी गेलो होतो परंतु आम्हाला धोका मिळाला. आता आम्ही सावध झालो असून मत चोरी संदर्भात आमचा पाठिंबा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील अबू आझमी यांनी भाष्य केले.
कोणत्याही गोष्टीची सक्ती करणे योग्य नाही, मराठी लोक चांगले आहेत. सोनिया गांधींना जर्सी गाय वगैरे बोललं जातं हे अत्यंत चुकीचं आहे. राहुल गांधींनी कधीही सुरुवात केली नसून सोनिया गांधी बद्दल जे बोलणं झालं ते अपमानित करण्यासारखं आहे असं तुम्हाला वाटत नाही का असा सवालही अबू आझमी यांनी विचारला. (Abu Azmi on Vande Mataram issue)












