Election Commission SIR dates announcement : निवडणूक आयोग आज देशव्यापी मतदार यादी पुनरीक्षण (SIR) च्या पहिल्या टप्प्याच्या तारखा जाहीर करण्याची अपेक्षा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 4:15 वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे, जिथं संपूर्ण तपशील शेअर केला जाईल. असं वृत्त आहे की पहिल्या टप्प्यात 2026 मध्ये विधानसभा निवडणुका असलेल्या 10 ते 15 राज्यांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण केलं जाईल. 2026 मध्ये आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या पथकानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी (CEOs) बैठकीनंतर देशभरात SIR स्वरुप अंतिम केलं. सर्व CEOs ला मागील SIR अंतर्गत अद्ययावत मतदार याद्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यांत SIR?
पश्चिम बंगाल
आसाम
तामिळनाडू
पुद्दुचेरी
केरळ
SIR म्हणजे काय? :
SIR ही निवडणूक आयोगाद्वारे राबविण्यात येणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मतदार याद्या अद्ययावत केल्या जातात. विशेष सघन पुनरीक्षण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे निवडणूक आयोग मतदार यादी अद्ययावत करतो. उदाहरणार्थ, कधीकधी असं आढळून येतं की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आहे परंतु त्यांचं नाव मतदार यादीत राहिलं आहे, किंवा कधीकधी एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाली आहे परंतु त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही. अशा परिस्थितीत, विशेष सघन पुनरीक्षणाद्वारे नावं मतदार यादीत समाविष्ट केली जातात किंवा वगळली जातात. कधीकधी, लोक निवडणूक होत असलेल्या क्षेत्रातून निघून गेले आहेत आणि अशा परिस्थितीत, मतदाराचं नाव एसआयआरद्वारे यादीतून वगळलं जातं.
सर्व मतदारांना त्यांची कागदपत्रे दाखवावी लागतील का? (Election Commission SIR dates announcement)
बरेच लोक असा प्रश्न विचारतात की, एसआयआर प्रक्रियेमुळं, सर्व मतदारांना त्यांची कागदपत्रं दाखवावी लागतील का. खरं तर, असं अजिबात नाही. जर एखाद्या मतदाराचं नाव कोणत्याही कारणास्तव मतदार यादीतून वगळलं गेलं असेल, तर ते त्यांचे कागदपत्रं दाखवून त्यांचं नाव जोडू शकतात. ज्यांची नावं आधीच मतदार यादीत आहेत त्यांना कोणतेही कागदपत्रं दाखवण्याची आवश्यकता नाही.












