Jain Boarding Trust land dispute : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेसंबंधित वादात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप प्रत्यारोप लागवण्यात आले होते. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुरलीधर मोहोळ यांची रात्री उशिरा विमानतळावर भेट झाली. ही भेट नेमकं कशासाठी तेथे नेमकं काय घडलं यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या बोर्डिंग ट्रस्टच्या जमीनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर ने घेतलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काल रात्री 1.30 वाजेच्या सुमारास मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. याठिकाणी केंद्रीय मंत्री शहा यांचे स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण यासारख्या नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेसंबंधित राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आरोप प्रत्यारोप केले आहे. परंतु खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व आरोप प्रत्यारोप फेटाळून लावले आहेत. या बोर्डिंग ट्रस्टच्या जमीनीचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
काल जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचे बिल्डर विशाल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्याबाबत सांगितले. त्यांनी मेल करून माझे पैसे परत देण्याची विनंती केली. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री उशिरा मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. या विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी भेटीदरम्यान पुष्पगुच्छ देऊन अमित शाह यांचे स्वागत केले. (Jain Boarding Trust land dispute)










