मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. अंतरवली सराटी येथे २५ जानेवारीपासून या उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या मागण्यांची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी बेइमानी करणार नाहीत,” अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
जरांगे पाटील यांची मागण्या आणि टीका जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाला न्याय देण्यात होणाऱ्या विलंबाबद्दल टीका केली. “मराठा समाज रस्त्यावर झुंजतोय, पण सरकारला त्यांची व्यथा कळत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढील मागण्या केल्या
सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी: सगे सोयरे कायद्याच्या अधिसूचनेला एक वर्ष पूर्ण होत असताना त्याची त्वरित अंमलबजावणी करावी
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा उचलून धरला. “संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढणार आहोत. गुंडांच्या टोळ्या नायनाट करणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.












