Bilaspur train accident: मंगळवारी संध्याकाळी छत्तीसगडमधील बिलासपूर इथं एक भीषण रेल्वे अपघात घडला. गेवरा रोडवरुन बिलासपूरला जाणारी एक प्रवासी ट्रेन (मेमू) एका थांबलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात मृतांची संख्या 11 झाली आहे, तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं सिग्नल ओलांडल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं आहे. जखमींना बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता या मार्गावरुन रेल्वे वाहतून पुर्ववत सुरु झाली आहे.
हे हि वाचा : अमेरिकेत भयानक विमान अपघात, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळलं; अनेकांचा मृत्यू
कशामुळं झाला अपघात :
बिलासपूर-कटनी विभागात ही टक्कर झाली, ज्यात अनेक डबे रुळावरून घसरले आणि मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की मेमू लोकल ट्रेननं सिग्नलकडे दुर्लक्ष करुन थांबलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडक दिली. टक्करीच्या तीव्रतेमुळं ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टीमचं नुकसान झालं.
Chhattisgarh: 11 dead, several injured in Bilaspur train accident
Read @ANI Story | https://t.co/wNenJQyK12#Bilaspur #TrainAccident #DeathToll pic.twitter.com/pUYZ1TQZmd
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2025
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त :
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आणि ते “अत्यंत दुःखद” म्हटलं. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की त्यांनी बिलासपूर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्वरित मदत आणि मदतीचे निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनानं मृतांच्या कुटुंबियांना ₹10 लाख, गंभीर जखमींना ₹5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ₹1 लाख भरपाई जाहीर केली. अपघातानंतर, अनेक गाड्यांच्या हालचालींवर परिणाम झाला आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रुळ मोकळा करण्यासाठी वाहतूक नियंत्रित केली जात होती. (Bilaspur train accident)












