Chunar train accident Uttar Pradesh : देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशात एक मोठा अपघात झाला. कार्तिक पौर्णिमेला स्नान करण्यासाठी सोनभद्रहून मिर्झापूरला आलेल्या सोनभद्र येथील सहा महिला चुनार रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली चिरडल्या गेल्या. त्यापैकी चार महिला एकाच कुटुंबातील होत्या. त्या चुनार रेल्वे स्थानकावर गोमोह चोपन पॅसेंजर ट्रेनमधून उतरल्या होत्या.
नेमकं काय घडलं :
या महिला ट्रेनच्या विरुद्ध बाजूनं जाण्याऐवजी प्लॅटफॉर्मवरुन उतरत होत्या. स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी त्या फूटओव्हर ब्रिज वापरण्याऐवजी प्लॅटफॉर्म ओलांडत होत्या. रेल्वे रुळ ओलांडत असताना, सविता, तिची भाची अंजू, शिवकुमारी आणि साधना यांना वेगाने येणाऱ्या कालका एक्सप्रेस ट्रेननं धडक दिली, ज्यामुळं चौघीही जागीच ठार झाल्या. शिवकुमारी आणि साधना या सख्ख्या बहिणी होत्या.
Uttar Pradesh: UP Minister Sanjeev Kumar Gaud confirms 6 dead in Chunar railway tragedy
Read @ANI Story | https://t.co/OeihtcVD7L#ChunarRailwayTragedy #Prayagraj #TrainAccident pic.twitter.com/aWjNTprxEX
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2025
रेल्वे स्थानकावर गोंधळ :
या अपघातानंतर चुनार रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. आरपीएफ आणि रेल्वे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरु केलं. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृतदेह विद्रूप झाले होते. जीआरपी-आरपीएफ पथकाने मृतदेह रुळावरून काढले आणि त्यांची ओळख पटवली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुशीला देवी (60) आणि कलावती देवी (50) यांचा समावेश आहे.
चुनार रेल्वे स्थानकावर अपघात कसा झाला :
चोपानहून चुनारला जाणारी एक प्रवासी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आली. काही प्रवासी प्लॅटफॉर्मऐवजी दुसऱ्या बाजूला उतरले आणि बाहेर पडण्यासाठी रुळ ओलांडू लागले. त्यानंतर त्यांना कालका एक्सप्रेस ट्रेननं धडक दिली.
मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं :
चुनार रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.







