डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली नंदनगर दुर्घटनचं बचावकार्य दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. बुधवारी रात्री 16 तासांनंतर ढिगाऱ्यातून दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. यामुळं ढिगाऱ्याखाली अनेक लोक सापडण्याची शक्यता आहे. सध्या चमोली नंदनगर दुर्घटनेत बेपत्त झालेल्या नागरिकांची संख्या 8 इतकी आहे. पोलीस आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्यातून त्यांचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू : चमोली नंदनगर परिसरात पोलीस, प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या सहकार्यानं चमोली नंदनगर आपत्तीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चमोली नंदनगर आपत्तीबद्दल पोलीस सतत अपडेट देत आहेत.
वाहतुकीसाठी रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न : मुसळधार पावसामुळं चमोली, नंदनगर परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बचावकार्य सुरू असताना आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. तर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं दोन ग्रामस्थांना वाचवण्यात यश आलं आहे. चमोलीचे डीएम आणि एसपी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी चमोली नंदनगर आपत्तीतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नंदप्रयाग-नंदनगर रस्ता बंद आहे. रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती, चमोली पोलिसांनी दिली.
मुसळधार पावसामुळं मोठं नुकसान : 17 सप्टेंबरच्या रात्री नंदनगर परिसरातील कुंतारी, धुर्मा गावातील मुसळधार पावसामुळं परिस्थिती बिकट झाली. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ढिगाऱ्यात 12 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. दोघांचं मृतदेह बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्यातून आणखी दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आठ जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहीम सुरू आहे. धुर्मा वॉर्डातील कुंतारी लगफलीमध्ये 27 ते 30 इमारती आणि गोशाळांचे नुकसान झाले.