Venkateswara Swamy Temple stampede : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातून सध्याची मोठी बातमी येत आहे. देवउठनी एकादशीनिमित्त काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. मंदिर परिसरात भाविकांची संख्या अचानक वाढली, ज्यामुळं गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीत किमान 9 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आणखी अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा : सरकारला उशीरा जाग! डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’
मदत आणि बचाव कार्य सुरु :
जखमी आणि मृतांच्या संख्येबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे, ज्यामुळं मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचं पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu tweets, “The stampede incident at the Venkateswara Temple in Kasibugga in Srikakulam district has caused a shock. The death of devotees in this tragic incident is extremely heartbreaking… I have instructed the officials to provide speedy and… https://t.co/SSHk4CGOnO pic.twitter.com/UdbrlEKKZ1
— ANI (@ANI) November 1, 2025
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता (Venkateswara Swamy Temple stampede)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळं मला खूप धक्का बसला आहे. या दुःखद घटनेत झालेले जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींवर त्वरित आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची पाहणी करण्याची विनंती केली आहे.”
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पीएमओकडून एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळं मला खूप दुःख झालं आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपये मिळतील.
राष्ट्रपतींनीही व्यक्त केला शोक :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक्सवरील पोस्टनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलं आहे की, “आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या दुःखद घटनेत झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल जाणून धक्का बसला आहे. मी शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करते.”










