रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात आले आहे. हे शिबिर १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत होणार आहे. या शिबिरामध्ये रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूतील परिसरातील जवळपास २० ते २५ शाळेतील मुले या शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेतील विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.