भारतीय वस्तूंवर अमेरिकेने लादलेल्या 50% टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, तर रिझर्व्ह बँक आवश्यक धोरणात्मक पावले उचलेल, असे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की बँकिंग क्षेत्राला पुरेशी तरलता देण्यात आली असून, वाढीसाठी लागेल ते सर्व समर्थन आरबीआय देईल.