रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 4 जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या 11 चाहत्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निर्णयाची घोषणा RCB ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांद्वारे केली. संघाने ‘RCB Cares’ या उपक्रमाच्या माध्यमातून या मदतीची घोषणा केली असून, भविष्यात या उपक्रमांतर्गत अधिक मदत केली जाईल.