आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले संग्रह अत्यंत फेमस आहेत. विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला. या संकटांचा सामना करत असताना त्यांनी खचून न जाता यशाचे शिखर गाठले. आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्र या संग्रहामध्ये त्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल सांगितलं. आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवन, सुखी कुटुंब, सुख संपत्ती, पैसा, यश याबाबत देखील भाष्य केले आहे. त्यानुसार आजच्या चाणक्य नीति मध्ये आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या सवयींमुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल होतो.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये सांगितले की, बरेच व्यक्ती धनसंपत्ती संदर्भात काही चुका करतात. आणि या चुकांमुळे स्वतः एखाद्या अडचणींमध्ये पडतात. परंतु वेळ निघून गेल्यावर या अडचणीतून बाहेर पडणे अत्यंत मुश्किल असते. त्यांच्याकडे असलेली धनसंपत्ती या चुका केल्यामुळे संपुष्टात येते. आजचे चाणक्य नीति मध्ये आपण अशा कोणत्या धनसंपत्ती संदर्भात चुका आहेत हे जाणून घेणार आहोत.
- कर्ज घेतलेल्या पैशांनी वायफळ खर्च करू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल तर कर्जाचे पैसे कधीच गरज नसलेल्या गोष्टींमध्ये खर्च करू नका. जे व्यक्ती कोणताही विचार न करता एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतात ते व्यक्ती सतत दुखी राहतात. त्यामुळे गरज नसलेल्या गोष्टींसाठी कधीच कर्ज घेऊ नये. आणि कर्ज घेतल्यास वायफळ खर्चासाठी कर्जाचे पैसे खर्च करू नये. कर्जामध्ये घेतलेले पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तींना सतत धनसंपत्ती सोबत जोडलेल्या परेशानीचा सामना करावा लागतो.
- मोठे कर्ज घेण्यापूर्वी विचार करा
आचार्य चाणक्य यांच्या मते, कर्ज घेतल्यामुळे तुमच्याकडे असलेली धनसंपत्ती, घर देखील तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे कर्ज घेताना प्रत्येक गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही घेतलेले कर्ज फेडू शकत नसाल तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडे कोणतीच पूर्व योजना किंवा माहिती नसेल तर व्यक्तींनी कधीच मोठे कर्ज घेऊ नये. कारण हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नाके नऊ येऊ शकतात. आणि यामुळे बरेच प्रॉब्लेम देखील होऊ शकतात.
- कर्ज घेतलेले व्यक्ती कधीच राहू शकत नाही खुश
आचार्य चाणक्य सांगतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकट येते, तेव्हा पैसा धनसंपत्ती हेच त्याचे सर्वात मोठे साथी असतात. परंतु कर्जामध्ये असलेल्या व्यक्तीकडे ना पैसा असतो ना समाधान. ज्या व्यक्तींवर कर्जाचे खूप मोठे ओझे असते, तो व्यक्ती कधीच आयुष्यात खुश राहू शकत नाही. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही एखादे कर्ज फेडू शकत नसाल तर कर्ज कधीच घेऊ नका.
- पैसा जपून वापरा
आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने पैसा हा जपून वापरायला हवा. जेणेकरून अडी अडचणीच्या कामात जपून ठेवलेला पैसा कामात येईल. आणि पैशांचा वापर गरजेपुरता केल्यामुळे कर्ज घेण्याची वेळ देखील कोणत्याच व्यक्तीवर येणार नाही. यासोबतच ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे, त्या व्यक्ती ने सुद्धा पैसा हा जपून वापरून कर्ज लवकरात लवकर फेडले पाहिजे. जेणेकरून व्यक्तीच्या डोक्यावरचे बोझ कमी होईल.