आचार्य चाणक्य यांचे लिखाण आपण सतत ऐकत असतो. त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. त्यापैकी नीतिशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असून यामधून आचार्य चाणक्य समाजातील लोकांमध्ये असलेल्या गुणांबद्दल माहिती करून देतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण असतात. त्याचबरोबर बरेच लोक संपत्तीच्या मागे पळत चुकीच्या पद्धतीने संपत्ती जमा करतात. चोरी, खोटं बोलून अशा अनेक वाईट पद्धतीने कमावलेले पैसे आणि संपत्ती काहीच कामाची नसते. आणि चांगल्या कामातून स्वतःच्या मेहनतीने कमावलेला पैसा हा आयुष्यभर टिकतो.
रुजूस्वभावो जने्षु दुर्लभ
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकामध्ये सांगितलं की, समाजामध्ये बऱ्याच प्रकारचे व्यक्ती आढळतात. समाजात त्यांची वागणूक ही साधारण, सभ्य, प्रामाणिक आणि निस्वार्थी लोक खूप कमी भेटतात. हे लोक भेटल्यानंतर कायम लक्षात राहतात. यालाच अपवाद म्हणजे बरेच लोक स्वार्थासाठी काम करत असतात. हे लोक प्रचंड हानिकारक असतात परंतु निस्वार्थी लोक कधी स्वतःचा स्वार्थ पाहत नाहीत.
अवमानेनागतमैश्वर्यमवमन्यते साधू
आचार्य चाणक्य यांच्या मते, आजकाल प्रत्येक व्यक्तीला संपत्तीचा मोह मोठ्या प्रमाणात आहे. संपत्तीसाठी बरेच जण स्वार्थापोटी काहीही करू शकतात. परंतु वाईट कामे करून मिळणारा पैसा सर्वसाधारण, प्रामाणिक आणि निस्वार्थी लोकांना आवडत नाही. आणि ते लोक वाईट मार्गाने येणारी संपत्ती स्वीकारत देखील नाही. निस्वार्थी सज्जन लोक स्वतः पैसे कमावतात आणि संपत्ती जमा करतात परंतु त्यांना संपत्तीचा मोह नसतो. त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये सांगितल्या प्रमाणे अपमानाने मिळणाऱ्या संपत्तीला संत देखील तुच्छ मानतात.
हे हि वाचा : चाणक्य नीति : यश मिळवण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे, समजून घ्या चाणक्य नीति चे सिद्धांत
बहुनपि गुणानेको दोषो ग्रसते
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकामध्ये सांगितलं की, बऱ्याचदा आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळे गुण असतात. त्यापैकी दयाळू व्यक्ती सतत कोणाला न कोणाला मदत करत असतो. त्याचबरोबर काही व्यक्तींमध्ये जे काही दोष असतात, विचित्र गुण असतात त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. अशा वेळेस स्वतःचा आढावा घेत राहणे, स्वतःच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.












