आचार्य चाणक्यांनी केलेल्या लिखाणाचे आणि नितीचे बरेच जण पालन करत असतात. प्रत्येक व्यक्तीला आचार्य चाणक्य यांच्याप्रमाणे बुद्धिमान बनायचे आहे. आचार्य चाणक्य यांनी आतापर्यंत प्रचंड लिखाण केलेले असून त्यापैकी नीतीशास्त्र हे फेमस आहे. जीवन कसे जगावे, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी चे मार्ग, यश मिळवण्यासाठी गरजेचे प्रयत्न, यासोबतच जीवनात कोणत्या गोष्टी करणे गरजेचे यासारख्या बऱ्याच अडचणी नीतिशास्र या साहित्यातून आचार्य चाणक्य दूर करतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री आणि दुश्मनी ही विचारपूर्वक केली पाहिजे. नाहीतर मैत्री आणि दुश्मनी तुम्हाला दोन्हीही भारी पडू शकते. जीवनात असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी पंगा घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आज या संदर्भात नीती आपण पाहणार आहोत.
1. कवी लोकांसोबत कधीच करू नका मैत्री आणि दुश्मनी
आचार्य चाणक्य नुसार, कधीही कवी सोबत मैत्री आणि दुश्मनी करू नका. कारण कवी त्यांच्या कवितेतून सहजतेने एखादी गोष्ट बोलून जातो. त्यामुळे त्याचा त्रास समोरील व्यक्ती होऊ शकतो. म्हणूनच कवी लोकांसोबत मैत्री करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा : चाणक्य नीती : या वस्तू दान केल्यास गरीब व्यक्ती देखील होऊ शकतो करोडपती
2. दारू किंवा नशेच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री किंवा दुश्मनी करू नका
बरेच व्यक्ती हे सतत दारूच्या नशेमध्ये आढळतात. नशेमध्ये त्यांना कोणतीच गोष्ट सुचत नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य नुसार कधीच दारू पिणाऱ्या , नशे मध्ये असलेल्या व्यक्तींसोबत मैत्री करू नका. अशा व्यक्तींसोबत मैत्री किंवा दुश्मनी केल्यास दारूच्या नशेमध्ये ते काहीही बोलून जातात. हे समोरच्या व्यक्तीला सहन होत नाही. यासोबतच ते नेहमी खोटे बोलत असतात.
3. स्वार्थी लोकांसोबत कधीच करू नका मैत्री
जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती असतात. आपल्याला स्वार्थी लोक पदोपदी भेटत असतात. परंतु अशा व्यक्तींसोबत मैत्री करणे आणि दुश्मनी करणे चुकीचे आहे. कारण हे व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही नातं जपत असतात. स्वार्थी व्यक्ती कधीच दुसऱ्यांचा विचार करत नाही. ते कधीही कोणाला धोका देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वार्थी लोकांपासून लांब राहणे गरजेचे आहे.