आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. हे प्राचीन भारतीय राजनीति शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला. आपल्या सर्वांना त्यांनी लेखन केलेल्या चाणक्य नीति अनुभवांचा संग्रह माहिती आहे. त्यांच्या नीतीशास्त्र या संग्रहात त्यांनी मानवाच्या अशा काही सवयींबद्दल सांगितलेलं असून या सवयी कधी कधी माणसाचं आयुष्य खराब करू शकतात. त्यामुळे खराब सवयींचा त्याग करून चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणे गरजेचे आहे.
संपत्ती ची लालच
आचार्य चाणक्य म्हणतात की, संपत्ती मिळवण्यासाठी लालची भावना तुम्हाला पैसा पासून वंचित करू शकते. तुम्ही मेहनतीच्या बळावर पैसे कमवू शकतात. पण तुम्ही दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा टाकत असाल तर ते अयोग्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पुण्य करत नसाल तर तुमची परिस्थिती बिघडू शकते.
अस्वच्छ राहणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक स्वच्छ आणि निरोगी राहत नाही. ते सतत आजारी पडतात. त्याचबरोबर जे लोक स्वच्छ राहत नाही चांगले वस्त्र घालत नाही त्यांच्या आजूबाजूला अस्वच्छ वातावरण निर्माण होते. हे लोक प्रत्येक वेळेस दारिद्र्यात जीवन जगतात. त्यामुळे स्वच्छ राहणीमान असणे गरजेचे आहे.
कडू बोलणे
जे लोक कर्कश्य आवाजात आणि कडू बोलतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कडू बोलण्याची सवय लवकरच बदलली पाहिजे. कडू बोलण्यामुळे समोरच्या व्यक्ती सोबतचे आपले संबंध खराब होऊ शकतात आणि लोक कंगाल पण होऊ शकतात.
सूर्यास्तानंतर झोपणे
सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही अत्यंत वाईट सवय आणि अशुभ असून यामुळे घरात दारिद्र्य येते. यामुळे घरात कधीही माता लक्ष्मी येत नाही आणि प्रसन्न होत नाही.