कोरेगाव पार्क–मुंढवा हिट अँड रन प्रकरणात आरोपी आयुष तायालने जामिनासाठी आठवेळा अर्ज दाखल करत न्यायालयाची दिशाभूल केली. कोर्टाने या दुरुपयोगाची गंभीर दखल घेत त्याचा जामीन फेटाळून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. आरोपीने दारूच्या नशेत ऑडी कारने डिलिव्हरी बॉय रौफ शेखला चिरडून ठार केलं होतं. सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हे आदेश दिले असून, 15 दिवसांत दंड भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपीच्या खोटेपणाला चाप देत कायद्याचा अपमान थांबवण्याचा ठोस निर्णय घेतला आहे.
(ABP)