कच्छ जिल्ह्यातील मधापर गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जातं. सुमारे ३२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १७ बँकांमध्ये तब्बल ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेव आहे. एनआरआय पटेल समाजाकडून होणाऱ्या पाठवणुकीमुळे गाव आर्थिकदृष्ट्या देशभरात आदर्श ठरत आहे.