कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रो-रो’ कार सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कोलाड ते वेर्णा मार्गावरच्या या प्रवासासाठी फक्त नवी मुंबईतील रोहन कंदर यांनी बुकिंग केलं आहे. त्यांनी ही सेवा त्यांच्या कुटुंबासह आरामशीर प्रवासासाठी निवडली आहे. मात्र, कमी बुकिंगमुळे ही सेवा रद्द होण्याची शक्यता असून, प्रवासाची अनिश्चितता कायम आहे.