महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांना आता दिलासा मिळाला आहे. त्यांना अटक न झाल्याने पीएमएल कोर्टाकडून जातमुचालक्यावर सुटका करण्यात आली आहे. ईडी ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्यासह एका व्यक्ती विरुद्घ पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले होते.