अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवले असल्याचा दावा करत याला “चांगलं पाऊल” म्हटले. मात्र, प्रत्यक्षात भारताने तेल खरेदी पूर्णपणे थांबवलेली नाही. काही सरकारी कंपन्यांनी स्पॉट मार्केटमधून खरेदी थांबवली असली, तरी रिलायन्स व नयारा यांसारख्या खासगी कंपन्या अजूनही रशियन तेल खरेदी करत आहेत. भारताने स्पष्ट केलं की, ऊर्जा खरेदी ही बाजारपेठेवर आणि राष्ट्रीय हितावर आधारित असेल.