शालेय बसचे वाढीव दर टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारने स्कूल व्हॅन परवाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधा असलेल्या 12+1 आसनी बीएस-6 श्रेणीतील व्हॅनना परवाना देण्यात येईल. यात वाहन ट्रॅकिंग, आपत्कालीन निर्गमन, अग्निशमन अलार्म यंत्रणा अशा सुविधा असतील. यामुळे पालकांना स्वस्त व सुरक्षित पर्याय मिळणार असून बेरोजगारांनाही रोजगार मिळेल.