सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ‘चोर’ गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवानिमित्त गणपती मंदिरला आकर्षक सजावट देखील करण्यात आली. सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या चोर गणपतीची १५० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची चतुर्थीच्या चार दिवस आधीच प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला आणि गेला याचा भक्तांना पत्ता नसतो म्हणून याला चोर गणपती म्हणतात.