गणेशोत्सवसाठी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी हे कृष्णा घाटाची पाहणी करण्यासाठी पोहचले. यावेळी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून पुरानंतर सरकारी घाटावर निर्माण झालेल्या घाणीची स्वच्छता युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी सांगली मिरजेतील सर्व विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाईल अशी ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि अधिकारी उपस्थित होते.