सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यनची चर्चा आहे. याचं कारण आर्यनने लिंगबदल शस्त्रक्रिया केली असून, अनाया झाली आहे. अनायाने आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग-बदल शस्त्रक्रिया केली आहे. तथापि, ही नवी ओळख निर्माण करताना अनायाला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. तिच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये आता तिच्यासाठी जागा नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. आपल्या निर्णयामुळे आधीच समाजाचा रोष स्विकारावा लागत असताना, अनायाला आपला आवडता खेळही सोडून द्यावा लागला. लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत, अनायाने क्रिकेट सोडण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितलं. अनायाने सांगितलं की तिचे वडील संजय यांनी भविष्यात क्रिकेटमध्ये तिच्यासाठी जागा नाही हे स्पष्ट केलं होतं. नेमकं त्यांच्यात काय संभाषण झालं होतं हे जाणून घ्या. हो, मला याची जाणीव आहे. ते फक्त हेच सांगत होते की क्रिकेटमध्ये माझ्यासाठी जागा नाही. मला स्वतःसाठी भूमिका घ्यावी लागली. माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले कारण मला असं वाटलं की संपूर्ण जग माझ्या विरोधात आहे आणि मी घेतलेल्या निर्णयामुळे (स्त्री होण्यासाठी हार्मोन थेरपी), आता या व्यवस्थेत माझ्यासाठी जागा उरली नाही. मूलभूत संधी आणि अधिकारही आता माझ्यासाठी राहिले नाहीत”