महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. मंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील.