राज्यातील आगामी गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे वाजवण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना डीजेऐवजी बँड, बँजो मागवा, असे आवाहन केले. यावेळी संजय शिरसाट यांनी एक मिश्कील टिप्पणी केली. तुम्ही बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.