स्वातंत्र्य दिनानिमित्त व ७५० व्या जयंती वर्षानिमित्त वसमत नगरपरिषदेच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी व वृक्षदिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी, महिला व चिमुकले सहभागी झाले. शहरभरातून काढलेल्या या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. नगरपरिषदेच्या पुढे महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.