पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या सरावली गावात गणेश विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली. १९ वर्षीय राजाबाबू राजकुमार पासवान हा तरुण तलावात बुडून मृत्यूमुखी पडला. विसर्जनाच्या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. रात्री उशिरा प्रशासनाच्या पथकाने मृतदेह शोधून बाहेर काढला. परिसरात शोककळा पसरली आहे.